Quit India movement | छोडो भारत चळवळ

Quit India movement 

चले जाव (छोडो भारत चळवळ )- ( Quit India movement)

 प्रास्ताविक : (चले जाव आंदोलन काळात विन्स्टन चर्चिल हे ब्रिटनचे पंतप्रधान होते)

1.क्रिप्स मिशन (मार्च १९४२) फसल्याने राष्ट्रीय सभेने स्वातंत्र चळवळ अधिक प्रखर करण्याचा निर्णय घेतला.

2. १४ जुलै १९४२ वर्धा येथे राष्ट्रसभेच्या कार्यकारिणीने 'छोडो भारत' चळवळीचा ठराव पास केला 

3. ८ ऑगस्ट १९४२ च्या गवालिया टॅंक मैदानावर (ऑगस्ट क्रांती मैदान )भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात पंडित नेहरू यांनी मांडलेला चले जाव चळवळीचा ठराव संमत करण्यात आला. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अबुलकलाम आझाद,

4. ८ ऑगस्ट रोजी गांधीजीनी भारतीय जनतेस 'करा किंवा मरा' (करेंगे या मरेंगे) हा संदेश दिला, याशिवाय 'ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे' असे ठणकावून सांगितले. 

5. ९ ऑगस्टच्या पहाटे सरकारने गांधीजी, पं. नेहरू, मौलाना आझाद यांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांना स्थानबद्ध केले. १५ जून १९४५ पर्यंत या नेत्यांना अज्ञातस्थळी डांबण्यात आले.

• वैशिष्ट्ये :

• प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने न गमगता जनतेने स्वतःच चलेजाव आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.

• देशभरातील शाळा, महाविद्यालये, कारखाने ओस पडले. आबालवृध्द व स्त्रिया रस्त्यावर आले.

• या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील नेत्यांनी भूमिगत राहून जनतेस मार्गदर्शन केले. 

• भूमिगत आंदोलन :

जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहरअली सुचेता कृपलानी, एस्. एम्. जोशी, ना. ग. गोरे आदी नेत्यांनी १९४२ च्या आंदोलनात भूमिगत राहून तीव्र केली. 

या भूमिगत नेत्यांनी सरकारी शस्त्रागारे व खजिने लुटले, दळणवळणाची मोडतोड केली व सरकारी यंत्रणा विस्कळीत केली.

• कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांनी 'आझाद दस्ता' ही क्रांतिकारी संस्था स्थापन केली.

● नागपूरच्या जनरल आवारी यांच्या 'लाल सेने' ने सरकारला हैराण करून सोडले.

• मुंबईत विठ्ठल जव्हेरी,उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी 'आझाद रेडिओ' हे केंद्र उभारले. यावरून आंदोलच्या बातम्या ,भाषणे केली जात असत.

 प्रतिसरकारे १९४२ च्या आंदोलनात 

बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व अझमगढ़, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे जनतेने प्रतिसरकारांची स्थापना केली. , 

महाराष्ट्रात १९४२ साली सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले. (सर्वात जास्त काळ चालले) 

याशिवाय १९४२ च्या आंदोलनात महाराष्ट्रातील आष्टी, चिमूर, यावली, महाड, अहमदनगर, पाथर्डी, गारगोटी नंदूरबार येथील जनतेने ब्रिटिशांविरुध्द केलेले लढे महत्त्वपूर्ण होते.

नंदूरबार येथील शिरीषकुमार हा शालेय विद्यार्थी गोळीबारात शहिद झाला, अशा प्रकारे १९४२ पासून चाललेल्या छोडो भारत चळवळीचा शेवट १९४७ च्या स्वातंत्र्यप्राप्तीने झाला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.