Gk question with answers | science 1 विज्ञान :- रक्ताभिसरण संस्था

 MPSC COMBINED PRE PYQ 2011 TO 2022

विज्ञान :- रक्ताभिसरण संस्था

प्र. 1. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्त पेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते ? (Group C Prelim - 2022)

(1) लिम्फोसाइट्स 

(2) मोनोसाइट्स

(3) इसिनोफिल्स

 (4) बेसोफिल्स

प्र. 2. सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा.(Rajyaseva Prelim 2021 )

(a) डावी लहान पोकळी / कप्पा (Left auricle)

(b) उजवी लहान पोकळी / कप्पा (Right auricle)

(c) डावी मोठी पोकळी / कप्पा (Left ventricle)

(d) उजवी मोठी पोकळी / कप्पा (Right ventricle) पर्यायी उत्तरे :

1) (a), (b), (d), (c)

2) (a), (b), (c), (d)

3 ) (b), (d), (a), (c)

4) (d), (c), (b), (a)

प्र. 3. "बंडल ऑफ हिज्" (His) जे जाळे (Rajyaseva - 2016)

1) संपूर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतूचे असते

2 ) संपूर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतूचे असते

3) फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते

4) हृदयातील जवनिकामध्ये पसरलेल्या मज्जातंतूचे असते.

प्र. 4. पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? (STI 2015)

(अ) मासे या प्राणीवर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रीय सर्वात कमी विकसित असते.

(ब) सर्पांमध्ये चार कप्पी हृदय नसते.

1) (अ) योग्य

2) (ब) योग्य.

3) अ व ब योग्य.

4) अ व ब अयोग्य.

प्र. 5. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? (STI 2015)

अ) पांढऱ्या (WBC) रक्तपेशी अस्थिमध्यात बनतात. 

ब) पांढऱ्या (WBC) पेशी जिवाणूंना (बॅक्टेरियांना) संपवतात.

1) (अ) योग्य.

2) (ब) योग्य.

3) (अ) व (ब) दोन्ही योग्य.

4) (अ) व (ब) दोन्ही योग्य नाहीत.

प्र. 6. युरियाचे वहन कोण करते? (Rajyaseva - 2014)

1) जीवद्रव्य + रक्त (Plasma + Blood) 

2) रक्त + ऑक्सीजन (Blood + O 2 )

3) तांबड्या रक्त पेशी + कार्बन डाय ऑक्साइड (RBC + CO)

4) पांढऱ्या रक्त पेशी + लाळ (WBC + Saliva)

प्र. 7. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? (Asst 2014 )

(1) मगर 

2) हत्ती 

3) सिंह 

4) जिराफ

8. अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? (Asst 2014)

1) रक्त गोठलेले असते.

2) रक्त थंड असते.

3) शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.

4) शरीराचे तापमान स्थिर असते.

9. सामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतो ? (Asst 2014)

1) कोयता किंवा विळीप्रमाणे (दात्राकार) (Sickle shaped)

2) द्विबहिर्वक्र (बाय कॉनव्हेक्स) (Biconvex disc)

3) द्विअंतर्वक्र (बायकॉनकेव्ह) (Biconcave disc)

4) वरील कोणताही नाही

10. मानवी शरीरात जवळजवळ किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.(STI 2013)

1) 10,000

2) 98,000

3) 97,000

4) 98,500

11. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या (blood vessels) असतात ? (STI 2012)

1) 97,000

2) 9,700

3)10,00

4) 21,000

12....... रक्त गोठण्याची (blood clotting) क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात. (STI 2011)

1) श्वेत रक्तकणिका (WBCs)

2) लसिका (Lymphs )

3) लोहित रक्तकणिका (RBCs)

4) रक्तपट्टीका (Blood platelets)

प्र.13. उच्चताणासारखा (Hypertension) आजार टाळण्यासाठी क्षारांच्या (salt) सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे?(STI 2011)

1) 2.5 ग्रॅम प्रतिदिन

2) 7.8 ग्रॅम प्रतिदिन

3) 5 ग्रॅम प्रतिदिन.

4) 1.2 ग्रॅम प्रतिदिन

प्र. 14. तुरटी (Alum) वापरतात. (STI 2011)

1) विदयुत विलेपनासाठी (for electroplating)

2) रक्त प्रवाह थांबविण्यासाठी (to stop bleeding)

3) शिल्प बनविण्यासाठी (for making statues )

4) कांच व रंग बनविण्यासाठी (for maunfacturing of glass and in paint industries)

उत्तरे 1) 4 ,2) 3 ,3) 3 ,4) 2 ,5) 3 ,6) 1 ,7) 4 ,8) 3 ,9) 3 ,10) 3 ,11) 1 ,12) 4 ,13) 3 ,14) 2

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.