समानार्थी शब्द
कावळा - वायस, एकाक्ष, काक, काउळा.
कासव - कमट, कमठ, कूर्म, कच्छप, कच्छ,
काळजी - चिंता, फिकीर, आस्था, कळकळ,
कार्यक्षम - कुशल, दक्ष, निपुण, हुशार, कर्तुमकर्ता.
काळोख - अंधार, तिमिर, तम, अंधकार.
कोकिळ - कोइल, कोयल, कोगूळ, कोकिल, पिक.
कोता - आखूड, अपुरा, लहान, कमी, क्षुद्र.
किरण - कर, अंशु, रश्मि, मयूख.
क्रीडा - क्रीडन, खेळ, मौज, विलास, लीला, मनोरंजन, विहार.
कुरूप - बेढब, आकाररहित, अरूप, विरूप, विद्रूप.
कौशल्य - नैपुण्य, खुबी, चातुर्य, करामत, कसब, प्रावीण्य.
कृष्ण - देवकीपुत्र, वासुदेव, विष्णूचा आठवा अवतार, कन्हैया, मुरलीधर, मुरारी, कान्हा.
कृपण - चिक्कू, कंजूष, कोमटा, हिमटा, खंख, खंक.
खग - पक्षी, विहंग, द्विज, अंडज, शकुन्त, विहंगम.
खच - ढीग, थर, रास.
खजिना - भांडार, तिजोरी, कोश, द्रव्यनिधी, भांडागार.
गरुड - वैनतेय, खगेंद्र, द्विजराज, खगेश्वर, तार्थ्य.
गरज - जरुरी, आवश्यकता, निकड.
गणपती - गजानन, वक्रतुंड, हेरंब, धरणीधर, लक्षप्रद, निधी, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, गणेश, विनायक, चिंतामणी, एकदंत.
गर्दी - दाटी, खच.
घर - सदन, भवन, गृह, गेह, आलय, निवास, धाम, निकेतन, आगर, भुवन.
घास - ग्रास, कवळ.
चंद्र - इंदू, शशी, विधू, सोम, हिमांशु, सुधांशू, सुधाकर, निशानाथ, रजनीनाथ, शशांक, नक्षत्रेश,
शशधर, कलानिधी, शुभ्रांशू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: