१८५७ नंतरचे भारतातील प्रमुख व्हाईसरॉय | MPSC HISTIORY.

१८५७ नंतरचे भारतातील प्रमुख व्हाईसरॉय

Mpsc history


           नोव्हेंबर १८५८ च्या राणीच्या जाहिरनाम्यानुसार भारतातील कंपनीची राजवट संपुष्टात येऊन राज्यकारभाराची सुत्रे ब्रिटिश पार्लमेंटकडे आली. ब्रिटिश शासनाने तूर्तास राज्यविस्ताराचे धोरण थांबवून सत्ता बळकट करण्यास प्राधान्य दिले. लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड मेयो, लॉर्ड रिपन यासारख्या व्हाईसरॉयनी उदारमतवादी धोरणाचा अवलंब करून भारतीयांची सहानुभूती मिळविली, तर लॉर्ड लिटनसारख्या व्हाईसरॉयने दमननीतिचा अवलंब केला.
     १८५७ नंतरचे भारतातील व्हाईसरॉय
                      १८५७ च्या जाहीरनाम्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाइसरॉय बनला. अशा रीतीने १८५७ च्या उठावावेळी गव्हर्नर जनरलपदी असलेला लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला.

१) लॉर्ड कॅनिंग : 

• (१८५६-१८५८ या काळात गव्हर्नर जनरल, १८५८-६२ या काळात व्हाईसरॉय)-
• भारताचा पहिला व्हाईसरॉय. (१८५८-१८६२)
• १८५७ चे बंड मोडून काढले.
• १८५६-५७ मध्ये आय. सी. एस. परीक्षेची भारतात सुरुवात केली.
• १८५७ मध्ये मुंबई, मद्रास, कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना केली.
• १८६० मध्ये आग्रा व लाहोर येथे दरबार भरवून संस्थानिकांना त्यांच्या सनदा परत करण्याची घोषणा केली.
• खालसा धोरण रद्द केले. १८३६ मध्ये लॉर्ड मेकॉलेने तयार केलेल्या 'इंडियन पीनल कोड' ला १८६० मध्ये कॅनिंगने मान्यता दिली.
• १८६१ च्या "Indian Highcourt Act' नुसार मुंबई, मद्रास व कोलकाता येथे उच्च न्यायालयांची स्थापना केली.
• भारतमंत्री चार्ल्स वूडच्या सल्ल्यानुसार १८५९ मध्ये भारतातील प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते सुरू केले.
• १८६४ मध्ये कोलकाता - अहमदाबाद लोहमार्ग सुरू केला. 
• १८५९ मध्ये शेतकऱ्यांसाठी हितकारक असा 'बंगाल रेट अॅक्ट' संमत केला.
• १८६१ चा कौन्सिल ॲक्ट संमत केला.

२) लॉर्ड एल्गिन पहिला (१८६२-६३ ) :

• सहिष्णू धोरणाचा पुरस्कर्ता होता.
• याच्या काळात विशेष अशा काही घडामोडी झाल्या नाहीत.
• धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) येथे मृत्यू झाला.

३) सर जॉन लॉरेन्स (१८६४-६९) :

• शेतकऱ्यांच्या हितासाठी पंजाब, अवध येथे 'टेनन्सी ॲक्टस्' पास केले..
•१८६८ मध्ये दुष्काळ आयोगाची (फॅमिन कमिशन) स्थापना केली. जलसिंचन खाते निर्माण करून त्यावर रिचर्ड स्ट्रॅची या तज्ज्ञाची नियुक्ती केली.
• पाटबंधारे खाते सुरू केले.
• सिमला हे उपराजधानीचे ठिकाण निर्माण केले.
• अफगाणिस्तानबरोबर उत्कृष्ट निष्क्रीयता धोरण राबविले. ४) लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) :
• १४ डिसेंबर १८७० चे आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केले.
• प्रांतिक स्वायत्ततेची सनद
• आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक
• भारताचा इतिहास १८७२ मध्ये पहिली जनगणना केली,
• याच्या काळात बहावी चळवळ,कुका चळवळ क्रियाशील झाल्या.
• १८७२ मध्ये अंदमान जेलमध्ये शेरअलीने या पठाणाने खून केला.

५) लॉड नॉर्थब्रुक (१८७२-७६) :

• बिहारमधील दुष्काळ, अफगाणिस्तानसंबंधी धोरण यावरून विवादास्पद
१८७५ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सची भारत भेट.

६) लॉर्ड लिटन (१८७६-१८८०) :

* १८७६-७८ च्या दुष्काळावर उपाय सुचविण्यासाठी रिचर्ड स्ट्रैची आयोग नेमला.
* १ जानेवारी १८७७ : दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास 'भारताची सम्राज्ञी' (कैसर-ए-हिंद) पदवी दिली.
* मार्च १८७८ : देशी वृत्तपत्र कायदा (व्हर्नाक्यूलर प्रेस अॅक्ट) संमत करून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली.

* १८७८ चा शस्त्रबंदी कायदा. (विनापरवाना शस्त्रे बाळगण्यास भारतीयांवर बंदी घातली )
* १८७९ चा statutory civil services act संमत करून परीक्षेची कमाल वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे केली.
* १८८३ ची दुष्काळ संहिता (Famine Code) तयार केली.
* मीठाच्या व्यापारावर जाचक कर लादले.

७) लॉर्ड रिपन (१८८०-८४ ) :

• मानवतावादी दृष्टीकोन व भारताबद्दलची आस्था यामुळे रिपनला भारतात कमालीची लोकप्रियता लाभली.
• म्हैसूर, बडोदा या राज्यांची पुनर्स्थापना (१८८१). .
• १८८१ : फॅक्टरी ॲक्ट  संमत केला (७ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घातली)
• १९ जानेवारी १८८२ : व्हर्नाक्यूलर प्रेस अॅक्ट रद्द केला.
• १८८२ : शिक्षणासंबंधी विचारार्थ विल्यम हंटर कमिशन नेमले.
• १८ मे १८८२ : स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला.
• २ फेब्रुवारी १८८३ : इलबर्ट विधेयक मंजूर केले. (त्यानुसार भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळाला.)
• रमेशचंद्र मित्तर यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
• नागरी सेवा परीक्षेची कमाल वयोमर्यादा १९ वरून पुन्हा २१ वर्षे केली.

८) लॉर्ड डफरिन (१८८४-८८) :

• २८ डिसेंबर १८८५ : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना..
• जानेवारी १८८६ : उत्तर ब्रम्हदेश भारतात विलिन करून घेतला. (३ रे बर्मा युद्ध)
• १८८६ : चार्लस् अचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना
• १८८७ : पंजाब कुळकायदा संमत केला.
• १६ फेब्रुवारी १८८७ : व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहणाच्या ५० व्या वर्धापनदिनाचे आयोजन केले .
• डफरिन यांच्या पत्नीने भारतीय स्त्रियांच्या आरोग्यासाठी लेडी डफरिन फंड स्थापन केला.
• इंपिरिअल सर्व्हिस ट्रुप्स योजनेंतर्गत संस्थानिकांना स्वतःचे सैन्य ठेवण्यास परवानगी. (पंजदेह प्रकरण)

९)लॉर्ड लान्सडाऊन (१८८८-१८९४ ) :

•  १८९२ : भारतीयांना शासनात प्रवेश देण्यासाठी 'कौन्सिल अॅक्ट' संमत केला.
• संमतीय कायद्यानुसार १२ वर्षांखालील मुलींचा विवाह बेकायदेशीर ठरवण्यात आला.
• याच्या काळात राजा प्रतापसिंग (काश्मीर) प्रकरण झाले,
• भारत-अफगाणिस्तानदरम्यान ड्यूरॅंड सीमारेषा आखली गेली.
• लिटनने सुरू केलेली स्टॅट्यूटरी सिव्हिल सर्व्हिस लान्सडाऊनने बंद केली.
• लॉर्ड एल्गिन दुसरा (१८९४-१८९९) :
• १८९६-९७ या काळात महाराष्ट्रात प्लेगची साथ आली.
• २२ जून १८९७ : जुलमी प्लेग कमिशनर रॅंड व त्याचा सहकारी आयर्स्ट यांची चापेकर बंधूनी हत्या केली.
• १८९९ : बिहारमध्ये संथाळांनी उठाव केला.

११) लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५) :

• १८९९ भारतीय चलन कायदा संमत, भारतासाठी सुवर्ण परिमाणाचा स्वीकार केला .
• १९०० : कोलकाता महापालिका विधेयक मंजूर करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियंत्रणे लादली.
• १९०० : लॉर्ड मॅक्डोनलच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमला.
• १९०१ शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी पंजाब लैंड एलीनेशन' कायदा संमत केला.
• सर्वाधिक रेल्वेमार्गाची निर्मिती..
• १९०१ सिमला येथे शिक्षणपरिषद,
• १९०१ वायव्य सरहद प्रांताची निर्मिती.
• १९०१: रॉयल नेव्हीची स्थापना.
• १९०१ संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षणासाठी 'इंपिरिअल फॅडेट कोअर' ची स्थापना
• १९०१ : राणी व्हिक्टोरियाच्या स्मृतिप्रित्यर्थ कोलकाता येथे 'व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल' स्मारक उभारले.
• १९०१ : ब्रिटिश वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी दिल्ली दरबार भरवला.
• १९०२: ॲण्ड्रयू फ्रेझर याच्या अध्यक्षतेखाली पोलिस सेवेतील दोष शोधण्यासाठी समिती नेमली.
• १२०४ विद्यापीठ कायदा संमत करून उच्च शिक्षणपध्दतीवर निबंध आणले,
• १९०४ : भारतातील पहिला सहकारी पतपेढी विषयक कायदा संमत केला.
• १९०४ भारतातील 'प्राचीन स्मारकांचा संरक्षण कायदा' संमत केला,
• १९ जुलै १९०५ : बंगालच्या अन्याय्य फाळणीची अधिसूचना काढली.
• फाळणीची मूळ कल्पना सर विल्यम वॉर्ड (१८९६) फाळणीस विरोध : हेनरी कॉटन (१८९६)
• फाळणीविरोधी स्वदेशी चळवळीस प्रारंभ १७ ऑगस्ट १९०५
• १६ ऑक्टोबर १९०५ : बंगालच्या फाळणीची अधिकृत घोषणा
• लष्करी अधिकान्यांसाठी क्वेट्टा येथे प्रशिक्षण केंद्र उभारले.
• लष्करी सेनापती किचनेरशी वाद व त्यावरून राजीनामा
• लो. टिळकांनी कर्झनची तुलना औरंजेबाशी केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.