मूलभूत हक्क | fundamental rights

 मूलभूत हक्क fundamental rights

मुलभूत हक्क


घटनेचा भाग तीन मध्ये कलम 12 पासून 35 पर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहेत.

० भाग तीनला भारताची मेग्नाकार्टा असे संबोधतात.

० मूलभूत हक्क अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारली आहेत.

० मूलभूत हक्क न्यायप्रविष्ठ आहेत.

मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये

1. मूलभूत हक्क घटनेचा अविभाज्य भाग आहेत

2. मूलभूत हक्क घटनेचा विस्तृत भाग आहेत.

3. काही हक्क फक्त भारतीयांनाच तर काही हक्क भारतीय परकीयांना आहेत.

फक्त भारतीयांसाठी 15,16, 19, 29, 30

भारतीय व परकीय दोघांना 14,20,21,21A, 22, 23, 24, 25, 26, 27, 28.

4. मूलभूत हक्क अमर्याद नाहीत.

5. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ठ आहेत.

6. काही हक्क हे राज्यसंस्थेच्या असंगत कृती वृद्ध तर काही खाजगी व्यक्तीविरुद्ध आहेत.

7. मूलभूत हक्कांत दुरुस्ती करता येते.

8. मूलभूत हक्क आणीबाणी दरम्यान स्थगित करता येतात मात्र 20, 21 वगळून.

भारतीय घटनेतील मूलभूत हक्क

1. समानतेचा हक्क 14 ते 18 

2. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 

3. शोषणाविरुद्ध हक्क 23 व 24 

4. धर्म स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28 

5. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29 व 32 

6. घटनात्मक उपायांचा हक्क 32 ते 35

पूर्वी संपत्तीचा हक्क कलम 31 सध्या वगळला आहे.

संपत्तीचा हक्क 44 वी घटना दुरुस्ती 1978 नुसार वगळला सध्या फक्त कायदेशीर हक्क म्हणून अस्तित्वात आहे( भाग-12 कलम 301.)

1. समानतेचा हक्क 14 ते 18

कलम 14 कायद्यापुढे समानता 

कलम 15 धर्म वंश जात लिंग जन्मस्थळ यावरून भेदभाव करण्यास मनाई 

कलम 16 नोकरीत समान संधी 

कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे कलम 

18 किताब नष्ट करणे.

2. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22

कलम 19 भाषण स्वातंत्र्य 

कलम 20 अपराधन बद्दलच्या दोष सिद्धी बाबत संरक्षण 

कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण 

कलम 21 शिक्षणाचा हक्क 

कलम 22 विवक्षित प्रकरणी अटक व स्थान बध्दता यापासून संरक्षण.

3. शोषणाविरुद्धचा हक्क 23 व 24

कलम 23 माणसांचा व्यापार व वेठबिगारीस मनाई 

कलम 24 धोकादायक ठिकाणी बालकांना कामास ठेवण्यास मनाई.

4. धर्म स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28  

कलम 25 सत्संग बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रचार

कलम 26 धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य

कलम 27 धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याचे स्वातंत्र्य 

कलम 28 शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य.

5. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29 व 30

कलम 29 अल्पसंख्याकांचे हितसंवर्धनाचे संरक्षण

कलम 30 अल्पसंख्यांक वर्गाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचे व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क.

6. घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 ते 35

कलम 32 भाग 3 ने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता उपाय 

कलम 33 सेना इत्यादी लागू करताना संसदेला त्यात बदल करता येणे 

कलम 34 एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा लागू असताना हक्कांवर बंधने 

कलम 35 या भागाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरिता विधी विधान.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.