History quiz| MPSC COMBINED PRE PYQ 2023

 

MPSC HISTORY PYQ | MPSC COMBINED PRE 2023 HISTORY QUESTIONS 

GK, HISTORY QUIZ


1. नारायणं मेघाजी लोखंडे यांनी 'बॉम्बे मिल हँण्ड असोसिएशन' ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते ?

अ. केशवराव बागडे, केशवराव बोले 

ब. रघु भिकाजी, गेणू बाबाजी 

क. नारायण सुर्काजी, विठ्ठलराव कोरगांवकर 

ड. कृष्णाजी अर्जुन केळूसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार 

(1) अ आणि ब फक्त 

(2) ब आणि ड फक्त

(3) अ, ब आणि क फक्त 

(4) ब, क आणि ड फक्त

2) इ.स. 1857 च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे हा गव्हर्नर जनरल म्हणाला.

(1) लॉर्ड डलहौसी

(2) लॉर्ड रिपन 

(3) लॉर्ड माऊंटबेंटन

(4) लॉर्ड कॅनिंग

3). प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ. दादोबा तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन, इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. 

ब. प्रार्थना समाजामार्फत 'सुबोध पत्रिका' सुरू केली. 

क. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना. म. जोशी यानी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी 'सोशल सर्व्हीस लीग'ची स्थापना केली.

ड. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली. 

(1) अ आणि ब फक्त 

(2) ब आणि क फक्त 

(3) अ, ब आणि क फक्त 

(4) ब, क आणि ड फक्त 

4. हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ) 9 एप्रिल, 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महिंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. 

ब) हिंदू महासभेचे अध्यक्ष बा.शि. मुंजे होते. क) डॉ. मुंजे, डॉ. हेडगेवार, डॉ. परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. 

ड) 28, 29, 80 डिसेंबर 1988 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. 

(1) अ, ब आणि क फक्त 

(2) ब, क आणि ड फक्त 

(3) अ, क आणि ड फक्त 

(4) वरील सर्व बरोबर

5). इ.स. 1857 च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबरगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती ?

अ). नील, हँबलॉक 

ब). औटरम, लारैन्स बंधू 

क). कँम्पबेल, सर ह्याम रोज 

ड) विल्यम डिम्बी, कॉलिन क्लार्क

(1)अ आणि ब फक्त

(2) ब आणि क फक्त 

(3) अ, ब आणि क फक्त

(4) ब, क आणि ड फक्त

6. इ.स. 1875 मधील शेतक-्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते ?

अ. भिमडी, शिरूर, पारनेर, नगर 

ब. इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा 

क, तासगांव, शिराळा, जत; मलकापूर 

ड. श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी

(1) अ आणि ब फक्त

(2) ब आणि क फक्त

 (3) अ, ब आणि ड फक्त 

(4) क आणि ड फक्त 

7. क्रांतीकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी/ आंदोलना मध्ये भाग घेतला होता ?

अ. गोवा मुक्ती संग्राम

ब. हैद्राबाद मुक्ती संग्रामं 

क. संयुक्त महाराष्ट्र चळवळ

ड. महाराष्ट्र - म्हैसूर -सीमा आंदोलन 

(1) अ आणि ब फक्त

(2) अ, ब आणि क फक्त  

(3) ब, क आणि ड फक्त

(4) वरील सर्व बरोबर

৪. इ. स. 1919 मध्ये ब्रिटीश,सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण

अ. क्रांतीकारकांच्या चळवळी मधून भारतीयांच्यात असंतोष वाढला 

ब. काँग्रेस व मुस्लीम लीग यांच्यातील युती 

क, जहाल व मवाळ यांच्यातील युती 

ड. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती

(1) अ आणि ब फक्त

(2) ब आणि क फक्त

(3) ब, क आणि ड फक्त 

(4) वरील सर्व बरोबर

9. यांनी स्वदेशी चळवळीचा'श्री गणेशा' करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली.

(1) गणेश वासुदेव जोशी 

(2) सीतारांम हरी चिपळूणकर 

(3) न्या. के. टी. तेलंग

(4) महात्मा फुले

Ans 1-4

2-4

3-3

4-1

5- 3

6- 3

7-4

8-4

9-1


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.